सेनगाव: होलगिरा येथे कालभैरव जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन,नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
सेनगांव तालुक्यातील होलगीरा या ठिकाणी आज कालभैरव जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महाकाली शक्ती संस्थान होलगिरा येथे या धार्मिक कार्यक्रमानिमित्त जगदीश्वर महाराज यांचे भव्य प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपारिक पद्धती नुसार सदरचा हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.