पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 14मधील महायुतीचे उमेदवार इक्बाल हुसेन काझी, सारिका अतुल भगत, सतीश दत्तात्रेय पाटील आणि रेणुका मयुरेश नेतकर यांच्या प्रचारासाठी शनिवारी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मतदारांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांच्या नकारात्मक राजकारणावर जोरदार टीका केली. महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेला असून विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी ठामपणे सांगितले.