श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे अनुसूचित जनजमाती भिल्ल समाजातील ऊसतोड मजुरांवर गावातील 70 ते 80 जणांनी जीवघेंना हल्ला केल्याची गंभीर घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी तातडीने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य ऊसतोड मजूर आणि अन्याय निवारण निर्मल सेवा समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे