अंबड: अंबड येथे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी “समाज जोडो यात्रा”चे आयोजन
Ambad, Jalna | Mar 23, 2026 अंबड (जि. जालना) – एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी “समाज जोडो यात्रा”चे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा बुधवार, दिनांक २५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंबड शहरात दाखल होणार आहे. अंबड-बीड रोडवरील स्वर्गीय वसंतराव नाईक चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविध भागांतील उपोषणकर्ते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जालन्याचे उपोषणकर्ते हरीश राठोड, परभणी जिल्ह्यातील जिंतूरचे विनोद आढे, छत्रपती संभाजीनगरचे अक्षय चव्हाण तसेच तेलंगणा राज्यातील क