औंढा नागनाथ: तहसील कार्यालयासमोरील अमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित;बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशासाठी सुरू होते उपोषण
बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील वडचुना येथील नामदेव राठोड हे दिनांक १२ सप्टेंबर शुक्रवार रोजी पासून औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते हे आमरण उपोषण दिनांक १६ सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान मान्यवरांच्या विनंतीवरून स्थगित करण्यात आले नायब तहसिलदार प्रवीण ऋषी यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी बंजारा समाजाचे नेते डॉक्टर बिडी चव्हाण यांच्यासह समाजची उपस्थिती होती