सेनगाव: गोरेगांव येथे शिवसेनेच्या वतीने आधार सेवा शिबिराचे आयोजन, अनेक नागरिकांनी घेतला लाभ
सेनगांव तालुक्यातील गोरेगांव या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आज आधार सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घेतला. नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यामुळे व तसेच गैरसोयी थांबावी या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने सदर सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे रणजीत पाटील गोरेगावकर,तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.