अकोला चॅरिटी बार असोसिएशनने राज्यातील मंदिरांच्या जमिनींवरील वाढत्या बेकायदेशीर हस्तांतरणांना आळा घालण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्याची मागणी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे. देवस्थानांच्या जमिनी भूमाफियांकडून हडपल्या जात असल्याने हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र घोषित करून कठोर शिक्षा करावी, असे अधिवक्त्यांचे मत आहे. या मागणीसाठी अधिवक्ता श्रुती भट यांच्या नेतृत्वात जिल्हा न्यायालय परिसरात स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली अ