सातारा: हरित सातारा अधिक व्यापकपणे काम करणारः सातारा क्लब येथील बैठकीत हरित सातारा फ्रंट वॉरियर्स सदस्यांचा निर्धार
Satara, Satara | Sep 18, 2025 गुरुवारी दुपारी १२ वाजता हरित सातारा फ्रंट वॉरियर्स सदस्यांची बैठक सातारा क्लब येथे पार पडली. त्या बैठकीत गेली तीन वर्ष हरित सातारा अजिंक्यतारा व मंगळाई देवी मंदिर परिसर या ठिकाणी लोकसहभागातून झाडे लावली आहेत. लावलेल्या झाडांचे सवंर्धन केलेले आहे. त्यास जिल्ह्यातील निसर्ग प प्रेमींचा कृतीशील सहभाग मिळत आहे. हे काम अधिक व्यापक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी कन्हैय्यालाल राजपुरोहित, संजय मिरजकर, सुधीर सुकाळे, दत्तात्रय वाळके, संजय झेपले, अमोल कोडक, आदी उपस्थित होते.