जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवार दि. 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मतदान शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या वेळेपूर्वी 48 तास सर्व प्रकारचा प्रचार थांबवणे बंधनकारक असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या अनुषंगाने जालना शहर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी उमेदवारांना आदेश दिलेत.