अमरावती: शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी;मुख्यमंत्री फडणवीस यांना स्मृती पुरस्कार प्रदान
आज २७ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी साडे तीन वाजता अमरावती येथे शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भव्य व गौरवशाली जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.अत्यंत प्रेरणादायी आणि सन्मानपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून शिक्षण, समाजपरिवर्तन आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा जागर करण्यात आला. या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने...