गडचिरोली: अंकीसा गावात स्मशानभूमीची मागणी, विश्व हिंदू परिषदेचे सिरोंचा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अंकीसा हे हिंदू बहुल गाव असून स्वातंत्र्याचा सत्तर वर्षांनंतरही गावाला स्मशानभूमी उपलब्ध नाही यामुळे गावकऱ्यांना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येची दखल घेत विश्व हिंदू परिषद उपखंड अंकीसा यांच्या वतीने आज दि.२५ सप्टेबंर गूरूवार रोजी दूपारी २ वाजता तहसीलदार सिरोंचा यांचा मार्फत जिलाधिकारी गडचिरोली याना निवेदन पाठविण्यात आले.