वसई: महामार्गावरील ससुनपाडा गावाच्या हद्दीतील जन्नत हॉटेलवर नायगाव पोलिसांनी कारवाई केली
Vasai, Palghar | Apr 22, 2024 मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ससुनपाडा गावाच्या हद्दीतील जन्नत हॉटेलवर गुरुवारी मध्यरात्री नायगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या हॉटेलमध्ये हुक्का बार चालवण्यासाठी मनाई असतानाही हुक्का बार सुरू होता. पोलिस अंमलदार सोमनाथ बोडके यांनी धाड मारून कारवाई केली आहे. पोलिसांनी २ हुक्का, पाइप, फ्लेव्हर असा एकूण १ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी मॅनेजर अश्रफ मंडल (५६), सागर केशरी (२४) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.