15 जानेवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतील जगणारे चौक येथे नाल्याच्या पाण्यात 45 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. फायर ब्रिगेडच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढून पुढील कारवाईसाठी मेडिकल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला. प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून नंदनवन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे