सेनगाव: सापडगांव पंचायत समिती गणातून विठ्ठल धाकतोडे निवडणूक लढवण्याची शक्यता,निवडणूक होणार चुरशीची
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले भाजपाचे पदाधिकारी विठ्ठल धाकतोडे हे आगामी सापडगांव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सापडगांव पंचायत समिती गणाचा विकास,गोरगरीब,कष्टकरी,शेतकऱ्यांचे प्रश्न व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण आगामी पंचायत समिती निवडणूक लढणार असल्याची माहिती आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता विठ्ठल धाकतोडे यांनी दिली आहे.