गोंदिया: पिकअपची मोटारसायकलला धडक; एक जखमी, खमारी गावाजवळ घटना
Gondiya, Gondia | Oct 15, 2025 ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खमारी गावाजवळ भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.फिर्यादी रंगलाल नारायण बोपचे (४९) रा. खमारी यांचा मोठा भाऊ हंसलाल नारायण बोपचे (५२) रा. खमारी हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच-३१ सीई-९९०० ने खमारी बसस