हवेली: बहिणीच्या खुनातील आरोपींना अटक करा अन्यथा पोलीस ठाण्याच्यासमोरच दहावा घालणार; मनीष ठाकूरचा पोलिसांना अल्टीमेटम
Haveli, Pune | Oct 20, 2025 मेडिकलमधील काम आटोपून घरी जात असताना एका 20 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना कोरेगावमूळ-प्रयागधाम रस्त्यावर मंगळवारी (ता. 14) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. या घटनेला 7 दिवस उलटल्यानंतरदेखील खुनाचा उलगडा करण्यास पोलिसांना अपयश आले आहे.