नूतन वर्ष २०२६ आणि २०८ व्या भीमा-कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून, नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर गुरुवारी अभिवादन सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हजारो अनुयायांनी उपस्थित राहून शौर्य गाथेला उजाळा दिला. दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आलेल्या भीमा-कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला या सैनिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना अर्पण केली.