जालना: मंठा चौफुली येथे भीषण आग; सुमारे 10 दुकाने जळून खाक; अग्निशमन दलाच्या प्रमुखाशी संपर्क होईना
Jalna, Jalna | May 3, 2026 जालना शहरातील मंठा चौफुली येथे रविवारी (दि. 3 मे 2026) रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे दहा दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापार्यांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढलेली असताना अचानक आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मंठा चौफुली परिसरात एका हॉटेलमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता प्रचंड वाढली होती.