जालना: जागेच्या वादातून मजुराला मारहाण; जीवे मारण्याची धमकी; मौजपुरी पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | May 13, 2026 जागेच्या वादातून एका मजुराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जालना तालुक्यातील हिवरा रोषणगाव येथे घडली. बुधवार दि. 13 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी दोन जणांविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. राजू संताराम थोरात रा. हिवरा रोषणगाव, ता. जि. जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मोटारसायकलने शेतात जात होते. यावेळी विठ्ठल माळाच्या कोपर्यावर भास्कर आसाराम थोरात आणि विठ्ठल सिताराम थोरात यांनी त्यांना आवाज देऊन थांबवले होते.