पाचोरा: विठ्ठलपुरा भागातील किराणा दुकानाच्या गोडाऊन मधून प्रतिबंधित गुटखा पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी केला जप्त, गुन्हा दाखल,
दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना पिंपळगांव हरे गावातील विठ्ठलपुरा भागातील गायत्री किराणा दुकानातील गोडावुन मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतीबंधीत गुटखा विक्रीसाठी आणलेला असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी पिंपळगांव हरे पोलीस स्टेशनकडील ग्रेडेड पोलीस उपनि प्रकाश पाटील, पो.हे.काँ. तात्याबा नागरे, पो.ना. पांडुरंग गोरबंजारा, अशांचे पथक तयार करुन त्यांनी बातमीप्रमाणे विठ्ठलपुरा भागातील गायत्री किराणात दुकानात धाड टाकली.