औंढा नागनाथ: उखळी येथे अवैध देशी दारूची वाहतूक करणारे वाहन पकडले,एक लाख 78 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त दोघांवर गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी येथे अवैध देशी दारू भिंगरी संत्राची चोरटी वाहतूक करणारी कार क्रमांक एमएच 05 एबी 6545 ही कार दिनांक चार नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री सव्वा अकरा वाजता उखळी गावात येताच ग्रामस्थांनी सदरील कार पकडून पोलिसांना माहिती दिली यानंतर औंढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व एक लाख 78 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोशि राजकुमार कुटे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर जाधव,रवीकुमार सानप वर औंढा पोलीसठाण्यात दिनांक 5 नोव्हेंबर बुधवार रोजी पहाटे तीनदरम्यान गुन्हा दाखल केला