पारोळा: तालुक्यात विविध ठिकाणी ढग फुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला
Parola, Jalgaon | Sep 22, 2025 शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकर माजवून शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे. याबाबत आ. अमोल पाटील यांनी मतदार संघातील ज्या गावांमध्ये पाऊस होऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.