गडचिरोली दि ३१ जुलै : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या ' धरती आबा ' आणि 'पीएम जनमन ' या योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा आणि या योजनांचा अंमलबजावणीचा प्रवास केवळ शासकीय न राहता या योजनांमध्ये लोकसहभाग वाढवून त्या एक लोकचळवळ बनाव्यात अशी अपेक्षा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली. या योजनांच्या अमल बजावणीचा आढावा घेण्यासाठी नागपूर विभागातील सर्व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची विभागीय बैठक गडचिरोली