मानगाव: माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षांना धक्का, अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांना सोडचिठ्ठी देत साई मोहल्ला, साई कोंड, सुर्ले, पवारवाडी, डोंगरोली व आदिवासी वाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. माणगाव तालुक्यातील विविध भागातून कार्यकर्त्यांचा रोज वाढत चाललेला पक्षप्रवेश हा शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेल्या झपाट्याने विकासकामांचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या सन्मानपूर्ण स्थानाचा पुरावा आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांचा शिवबंधन बांधून सन्मानपूर्वक पक्षप्रवेश करण्यात आला.