विक्रोळी पुर्व टागोर नगर मध्ये २८ जानेवारीला सकाळी ७ वाजता सार्वजनिक गणेशोत्सव समिती, विक्रोळीचा महाराजा, आणि ओम साईधाम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळी मिनी मॅरेथॉन स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जवळजवळ ७५० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात ही मिनी मॅरेथॉन पार पडली.