नायगाव-खैरगाव: नायगाव येथील तहसील कार्यालय समोरून शेतकऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारून अज्ञात दोन चोरट्यांनी सोन व पैसे घेऊन झाले फरार
आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान नायगाव तहसीलच्या मुख्य रस्त्यावरील देगाव येथील माधव गंगाराम मोरे हे शेतकरी आपल्या शेताकडे सोयाबीन काढत असलेल्या मशीनला पंचवीस हजार रुपये देण्यासाठी जात असताना हैदराबाद या महामार्गावर तहसील रोड इथे अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवर येऊन मोरे यांच्या तोंडाला स्प्रे मारून रोख रक्कम पंचवीस हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी घेऊन अज्ञात आरोपी झाले फरार.अज्ञात आरोपी विरुद्ध नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल