वर्धा जिल्ह्यातील पाच नगर परिषदेच्या मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे झालेल्या विलंबानंतर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग हायअलर्टवर आहेत.जिल्हा क्रीडा संकुलात त्रिस्तरीय सुरक्षा, सीसीटीव्ही निगराणी,जिल्हा पोलीस दल व एसआरपीएफचा ताफ्यासह अग्निशमन दल तैनात असून राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील सुरक्षेसोबत पहारा देत आहेत.