मोहाडी: खमारी येथे जुगार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा हमारी येथे मोहाडी पोलिसांनी दि.25 सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी 4 वाजताच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान जुगार खेळणारा आरोपी महेश अनंतलाल दमाहे याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील नगदी 500 रुपये व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.