अकोला: थकित मालमत्ता कराचा भरणा करणेसाठीची शास्ती अभय योजनेस ३१ ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ मनपा उपायुक्त पारतवार
Akola, Akola | Sep 30, 2025 अकोला महानगरपालिकेच्या थकित मालमत्ता कर शास्ती अभय योजनेची मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टी व सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी हा निर्णय घेतला. या योजनेत थकित कर एकरकमी भरल्यास शास्तीवर ७५% सूट मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. लहाने यांनी केले. तसेच थकित व चालू कर वेळेवर न भरल्यास सील, जप्ती व लिलावासारखी कारवाई होऊ शकते, असा इशारा उपायुक्त विजय पारतवार यांनी दिला असून नागरिकांनी सहकार्य करण्या