दिग्रस: शहरातील मानोरा रोडवरील श्री श्री माऊली जिनिंग येथे सीसीआय ची कापूस खरेदी सुरू
दिग्रस शहरातील मानोरा रोडवरील श्री श्री माऊली जिनिंग अँड प्रेसिंग येथे आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून भारतीय कापूस निगम सीसीआय मार्फत कापूस खरेदीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी खरेदी केंद्रावर सर्वप्रथम कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे सन्मान करून तसेच वाहन पूजन विधी करून खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी सीसीआयचे प्रतिनिधी साळुंके, जिनिंगचे सचिव रुपेश ठाकरे, तसेच कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.