शहरामधील कचरा मोठ्या प्रमाणा असल्यामुळे व मनपाचे कचरा गोळा करण्याचे नियोजन नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील कचरा मनपात आणून टाकण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची धास्ती घेत महानगरपालिका खडबडून जागी झाली असून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच महानगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात केली व शहरातील घंटा गाड्या पण शहरांमध्ये फिरताना दिसून येत आहेत.