जालना: बाजार वाहेगावातील तोतया डॉक्टराच्या उपचारानंतर वृद्धाचा मृत्यू; कारवाईची मागणी; संशयित फरार
Jalna, Jalna | Jun 9, 2026 बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथे सुरू असलेल्या एका कथित तोतया डॉक्टराच्या उपचारानंतर वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवार दि. 9 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एकतुनी येथील भीमराव काशिनाथ गिरे हे सुमारे दिवसांपूर्वी पायाला खाज येत असल्याने उपचारासाठी बाजार वाहेगाव येथे गेले होते.