भोकरदन: 29जून रोजी छ.संभाजीनगर येथे आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,मा.आ.चंद्रकांत पाटील दानवेचे संपर्क कार्यालयातून आवाहन
आज दिनांक 28 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की 29 जून रोजी छत्रपती संभाजी नगर येथे केंब्रिज चौकात कर्जमाफीसाठी आंदोलन होणार आहे,या आंदोलनात आ. रोहित पवार उपस्थित राहणार आहेत व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आंदोलन होत आहे,त्यामुळे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.