शाळेत जाणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात धरून लज्जास्पद वर्तन करणाऱ्या एका नराधमाविरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी कनोजे वय ३० वर्ष, राहणार आनंदनगर असे आरोपीचे नाव आहे.ही घटना शनिवारी सकाळी ७वाजेच्या सुमारास कामठी रेल्वे स्टेशनजवळील लिंबाच्या झाडापाशी घडली. पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला वाटेत अडवून तिचा उजवा हात पकडला आणि अश्लील भाषेत बोलून तिची छेड काढली.