अकोला: कापूस खरेदी मर्यादा वाढवा; सीसीआय कार्यालयात शिवसेना (उबाठा पक्ष) चे ठिय्याआंदोलन
Akola, Akola | Dec 3, 2025 प्रतीएकर 5.60 क्विंटलची कापूस खरेदी मर्यादा अव्यवहार्य असल्याने ती 15 क्विंटलपर्यंत वाढवावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, पूर्व प्रमुख राहुल कराळे, शिवा मोहोड, डॉ. प्रशांत अढाऊ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह सीसीआय कार्यालयात दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन झाले. कपाशी पिकाची हानी आणि खरेदीतील अडचणी यावर अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. वरिष्ठांशी चर्चा करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.