हलबा समाजाच्या मागणीसाठी डॉ. सुशील कोहाड आणि जगदीश खापेकर यांनी 5 डिसेंबरपासून सुरू केलेले आमरण उपोषण आता चिघळले आहे. उपोषणाच्या वाढत्या तीव्रतेमुळे हलबा समाजामध्ये संतापाची लाट उसळली.हलबा समाजाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त आंदोलकांनी नागपुरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे.