हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर हायवे ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग दि.9 ते 13 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी 45 ते 60 मिनीटांसाठी पुर्णतः थांबविण्यात येणार आहे. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ही माहिती दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे.