जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ एक हृदयद्रावक अपघाताची घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या एका रिक्षाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी थेट पुलाखालील खोल नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात किरण लक्ष्मण चव्हाण (वय ४०, रा. कोल्हेवाडा, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत गुरूवारी ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ॲपे रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.