जालना: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा; 15 सप्टेंबरला मोर्चा फत्ते करूया - शाहीर बाबू सेवा राठोड यांचा इशारा
Jalna, Jalna | Sep 14, 2025 हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात तातडीने समाविष्ट करावे, या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 4 दिवसांपासून श्रीकांत राठोड व हरीश राठोड हे दोघे समाजबांधव आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील समाजामध्ये सरकारमद्दल प्रचंड असंतोष असून शासनाने तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, त्यासाठी 15 सप्टेंबरला मोर्चा फत्ते करुन असे शाहिर बाबू सेवा राठोड यांनी रविवार दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता म्हटलंय.