श्रीगोंद्यात ८ बचत गटांना एक कोटीचे अर्थसाहाय्य श्रीगोंदा : तालुक्यातील १२ महिला बचत गटांना विविध बँकांच्या मदतीने १ कोटी ८ लाखांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. त्यामुळे महिला बचत लघुउद्योगांना चालना मिळणार आहे. या मदतीचा धनादेश आमदार विक्रमसिंह पाचपुते व गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या हस्ते देण्यात आला.श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात उमेद अभियानातील बचत गटांना कर्ज वितरण मेळावा झाला.