साकोली: साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेचे 71.24% मतदान, एनपीके प्राथमिक शाळेत उशिरापर्यंत चालले मतदान
साकोली सेंदूरवाफ नगरपरिषदेकरता आज मंगळवार दि 2 डिसेंबरला सकाळी7ते सायंकाळी5.30 पर्यंत घेण्यात आलेली निवडणूक शांततेत पार पडली असून रात्री नऊ वाजता मिळालेल्या आकडेवारीवरून 71.24% मतदान झाल्याचा अंदाज आहे.नंदलाल पाटील प्राथमिक शाळा साकोली येथे मात्र निवडणुकीची शेवटची वेळ5.30ची संपल्यानंतरही 70 मतदार हे रांगेत असल्याने या केंद्रावर उशिरापर्यंत मतदान झाले.नगराध्यक्षासाठी 9उमेदवार व 20 नगरसेवक पदासाठी 107उमेदवार रिंगणात होते. कुठल्याही केंद्रावर अव्यवस्था झाली नाही सुरळीतपणे निवडणूक पार पडली