माण: माण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये महिला उमेदवारांना संधी; अरुण गोरे यांचे सूचक विधान, विरोधकांची हवाच काढली
Man, Satara | Oct 21, 2025 माण तालुक्यामध्ये ऐन दिवाळीमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी सुरू झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यादरम्यान मंगळवारी दुपारी तीन वाजता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे यांनी दहिवडी येथे पत्रकार परिषद घेत माण तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटांमध्ये महिला उमेदवार असतील, असे स्पष्ट करून विरोधकांची हवा काढून टाकली आहे. माण तालुक्यात मसवड नगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आगामी काळात होत आहेत.