चिखलदरा: खारी फाट्यावर पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण
चिखलदरा तालुक्यातील खारी गावाजवळील भांडुम रोडवरील खारी फाट्यावर बांधलेल्या पुलाखाली शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सकाळच्या सुमारास पुलाखाली काही नागरिकांना संशयास्पद अवस्थेत पडलेला महिलेचा मृतदेह दिसला.त्यांनी तात्काळ चिखलदरा पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक प्रशांत मसराम घटनास्थळी दाखल झाले.