तुमसर: गोबरवाही येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलप्रादेशिक योजनेच्या निष्क्रियतेवर पं. स. सदस्य नरेंद्र गेडाम यांचा संताप
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गोबरवाही जलप्रादेशिक योजनेला सन 2000 च्या सुमारास सुरुवात झाली. या योजनेद्वारे सुमारे वीस गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र या योजनेचा गोबरवाही, सीतासावंगी, चिखला, राजापूर, नाकाडोंगरी व सुंदरटोला या सहा गावांना लाभ मिळाला नसून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा केला जातो. या गंभीर समस्येवर शासन व संबंधित विभागा विरोधात पं.स सदस्य नरेंद्र गेडाम यांनी प्रसारमाध्यमांसमोर संताप व्यक्त केला आहे.