कळमनूरी: कळमनुरी येथील विवाहितेचा पैशासाठी छळ,पोलिसात एकावर गुन्हा दाखल
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील बेदरवाडी येथील विवाहिता अर्चना राजेश चौधरी हल्ली मुक्काम कळमनुरी या विवाहितेस खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणून दि.1 सप्टेंबर 2007 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान शारीरिक मानसिक छळ करून मारहाण करण्यात आली .याप्रकरणी कळमनुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राजेश नामदेव चौधरी राहणार बेदरवाडी या विरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली आहे .