समुद्रपूर: राष्ट्रीय महामार्गावरील जाम चौकात आयशरच्या धडकेत मोपेडस्वार २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
समुद्रपूर तालुक्यातील जाम चौरसत्यावर आयसर ट्रकने मोपेडला जबर धडक दिली यात मोपेडस्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती २५ एप्रिलला २ वाजता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार मृत्यक नेहा राहुल तेलंगे वय २७ वर्ष राहणार कुणावार पेट्रोल पंप हिंगणघाट हि नेहमी प्रमाणे कार्यालयीन कामासाठी मोपेड क्रमांक एम.एच.३२ ऐ.वाय २१६५ ने हिंगणघाट वरुन जामकडे येत होती. याच दरम्यान जाम चौकात आयसर ग क्रमांक एच.आर .६२ ऐ ३९७२ ने जाम चौकात मोपेडला जबर धडक दिली या अपघातात नेहाचा मृत्यू झाला.