समुद्रपूर: कानकाटी येथे शेतीच्या वादातून भावानेच भावाला सम्पविले: पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
कानकाटी येथे शेतीच्या वादातून भावानेच भावाला काठीने वार करून सम्पविले असुन मृत्यकाचे नाव बेबल पवार वय २२ वर्ष असे आहे. यासंबंधी तिन जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. मृत्यू बेबल पवार हा पत्नी मदनीवरून पत्नी चिमा आणि मुलगा विष्णु पवार वय ०६ वर्ष, लहान मुलगी तनु पवार वय ०४ वर्ष यांना घेऊन घरी आला होता. बेबल पवार घराशेजारी असलेल्या टिनाचे शेड मध्ये बसले व पत्नी घरात जावुन कपडे बॅगमध्ये भरत होती. याच दरम्यान त्याला काठीने मारहाण केली.