सहा डिसेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कळमना पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्वच पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रामुख्याने सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ उपस्थित होते. तसेच कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.