आज दि 7 डिसेंबर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर रोडवर वैजापूर तालुक्यातील क्रांती फिटनेस क्लबजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव बसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ५६ वर्षीय दुचाकीस्वार भगवान माणिकराव सुलताने यांचा मृत्यू झाला. संपूर्ण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे. धडकेनंतर गंभीर जखमी झालेल्या सुलताने यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू