अमरावती मनपा निवडणुकीसाठी भाजप, युवा स्वाभिमान संघटना व शिंदे गटाची महायुती जवळपास निश्चित झाल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. आज भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार असून जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. युवा स्वाभिमान संघटनेच्या काही जागांवर निर्णय प्रलंबित असला तरी ९० टक्के जागा वाटप पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.